Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

येत्या ४८ तासात घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज,

भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस

भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस

पावसाच्या आशेने धरणे तहानलेली, पण आता दिलासा!येत्या ४८ तासात घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ होणार

शिव वार्ता – विशेष बातमी :-  नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा सध्या चिंताजनक पातळीवर आहे. आज दि. ६ जुलै २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार सर्व धरणे मिळून उपयुक्त क्षमतेच्या केवळ २०% इतकाच साठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला हा साठा ६५% होता.

आजचे धरणसाठे असे आहेत:

भंडारदरा: ३५९ दलघफु – ३४%निळवंडे: १३५१ दलघफु – १७% मुळा: १९०१ दलघफु – ९%दारणा: ५१३ दलघफु – ७%गंगापुर: १८५ दलघफु – ३%मुकणे: १४५ दलघफु – २०%सातत्याने पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र हवामान विभागाकडून मिळालेल्या अंदाजाने आता दिलासा मिळाला आहे.

मुंबईला घेरलेल्या कमी दाबामुळे मुसळधार पावसाची शक्यता

सध्या मुंबई व परिसरात सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा ६ जुलैच्या सायंकाळपासून ते ७ जुलैच्या सायंकाळपर्यंत दारणा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जाणार आहे. त्यामुळे अकोले आणि इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर २०० ते २५० मिमी इतकी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.त्यानंतर हा कमी दाबाचा पट्टा संगमनेर, नाशिक, सिन्नर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा या तालुक्यांमधून पुढे सरकणार आहे. त्यामुळे या सर्व भागांतही जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

हवामान तज्ञांच्या मते, येत्या ८ जुलैपर्यंत धरणसाठ्यात समाधानकारक वाढ होईल. त्याचबरोबर सर्वच भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागतील अशी आशा आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असला तरी, येणाऱ्या पावसामुळे परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.-

शिव वार्ता, नाशिक ब्युरो

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira